Founder Members

विष्णुदास भावे

जन्म : १८२४ मृत्यू : ९/८/१९०१

मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ ज्या नाटककाराने उभी केली तो हा नाटककार, विष्णुदास भावे. सांगलीच्या राजेसाहेबांच्या आज्ञेने ५ नोव्हेंबर १८४३ मध्ये ‘संगीत स्वयंवर’ या नाटकाने मराठी रंगभूमीचा आरंभ झाला.


श्रीमंतांना काही कानडी नाटके पाहून आपल्याकडे पण अशी नाटके करावी असे वाटले म्हणून ही जबाबदारी विष्णुपंतांवर सोपविली. अत्यंत परिश्रम घेऊन भाव्यांनी ही जबाबदारी पार पाडली. आणि आपले नाटक ‘सीता स्वयंवर’ श्रीमंतांना करून दाखविले. पुढे संस्थानचा आश्रय सुटल्यानंतर ७-८ वर्षे सांगलीत व पुढे पुणे, मुंबई अशा ठिकाणी प्रयोग करीत १८६ पर्यंत हा व्यवसाय केला.


मराठी नाटकाचा आरंभ सांगली येथे झाल्यामुळे सांगली ही नाट्यपंढरी मानली जाते. १८४३ वर्ष हे मराठी रंगभूमीचे जन्मवर्ष समजले जाते. तर ५ नोव्हेंबर हा दिवस प्रतिवर्षी ‘रंगभूमी-दिन’ म्हणून पाळला जातो.

Top

Moroba Wagholikar

The first generation actor of musical plays and an excellent singer, Moroba. Wagholikar was a minstrel (a religious singer) in his early career; who later joined a Tamasha group on being inspired by a Muslim tamasha artist named Dadu. Moroba had got a god-given gift of a very melodious and ringing voice and he was an excellent singer of the song-form called 'lavani'.


Around 1878 Moroba was under the patronage of a moneylender named Gulwe who gave Moroba 500 rupees as monthly salary. Gulwe also offered money to Annasaheb (Kirtoskar) for producing plays and allowed Moroba to join Annasaheb's drama company.


Moroba used to play Dushyanta in the musical play 'Shakuntal'. He used to sing 108 songs in it. In 'Soubhadra' he would be Arjun and looked handsome, stout and elegant in the role. Moroba had sparkling eyes and well-maintained physique.


He used to look after his own fitness and diet. He started the practice of burning 'Ood'-a fragnant incence before every show began. Moroba had invited Janglee Maharaj-a holy man, for the first show of his play 'Shakuntal'. Moroba requested Maharaj to sit in the first row, as his presence would ease out Moroba's tension.


Janglee Maharaj gave Moroba some 'Ood' and told him to burn it before the show began. Moroba burned it, mixing it with 'loban' and performed very well that evening. Since then all Marathi play performances began with this fragrant ritual.


Top

दिनकर ढेरे (कामण्णा)

जन्म : १९०१ मृत्यु : ३१/८/१९४३

दिनकरने वयाच्या सातव्या आठव्या वर्षी १९०८च्या सुमारास किर्लोस्कर नाटक मंडळीत प्रवेश केला. त्यांचे मामा कृष्णराव कोल्हापुरे त्याच कंपनीत १९०२ पासून होते. दिनकर काही नाटकातून छोट्या छोट्या भूमिका करी. पदेही कर्णमधुर गायचा. ‘विरतनय’ नाटकात बकुळची भूमिका हे छान करीत. १९१४ सालानंतर ‘नाट्यविनोद’ नाटक कंपनीत गेले.

त्यानंतर १९१८ मध्ये आपल्या मामांच्या नवीन निघालेल्या ‘बलवंत संगीत नाटक मंडळी’त दाखल झाले. ‘वीर विडंबन’ नाटकातील उत्तरची भूमिका उत्कृष्ट होत असे. ‘भावबंधन’ नाटक १८/१०/१९१९ रोजी ‘बलवंत संगीत मंडळी’ने रंगभूमीवर आणले त्यात घन:श्याम आणि लतिका यांच्या अनुक्रमे चिंतामणराव कोल्हटकर आणि मा. दीनानाथांनी केलेल्या भूमिका तर लोकांना आवडल्याच, पण दिनकरने महेश्वरच्या – कामण्णाच्या भूमिकेत वेगळीच मजा आणली. ती भूमिका त्यांना अगदी फिट्ट बसली आणि ते इतकी मनापासून आणि सहजतेने करीत की त्यांना त्या भूमिकेचेच नाव चिकटले आणि ते दिनकर ढेरे या नावाऐवजी ‘दिनकर कामण्णा’ याच नावाने सर्रास ओळखले जाऊ लागले. एक तप आपली कामण्णाची यशस्वी भूमिका गाजवून दिनकर ‘बलवंत नाटक कंपनी’ सोडून हिराबाई बडोदेकर यांच्या नाट्यशाखेत १९३३ मध्ये राहिले. त्यानंतर चित्रपटात गेले.

अनेक मराठी चित्रपटात विनोदी भूमिका करून त्यांनी रंगभूमीइतकीच तेथेही अमाप लोकप्रीयता मिळविली. १९४० नंतर पुनःश्च रंगभूमीवर पाऊल टाकले. शालेय शिक्षण अजिबात झाले नव्हते पण बालपणापासून नाटक कंपनीत वाढले असल्यामुळे ते चतुर, मिष्कील, हजरजबाबी व प्रसंगावधानी झाले होते. स्वतःच्या वाक्यचातुर्याने रंगभूमीवरील अनेक गंभीर व विनोदी प्रसंग त्यांनी निभावून नेल्याबद्दलचे कितीतरी किस्से आहेत.

Top

छोटा गंधर्व

जन्म : १०/३/१९९८ मृत्यू : ३१/१२/१९९७

‘बालमोहन संगीत मंडळी’चे मालक श्री. दामूअण्णा जोशी बालनटांच्या संस्थेत त्यांनी सौदागर गोरे ऊर्फ छोटा गंधर्व यांना कोरेगाव येथून घेऊन आले. विलक्षण मुलायम आवाजाची देणगी जात्याच होती. ‘बालमोहन संगीत मंडळी’ने ‘प्राणप्रतिष्ठा’ हे ऐतिहासिक नाटक बसवले. व २२ जुलै १९२८ रोजी पुण्यात विजयानंद थिएटरमध्ये त्याचा पहिला प्रयोग झाला.
सौदागरांच्या गंधर्वकल्प आवाजामुळे दामूअण्णा आपल्या नाटकांच्या जाहिरातीत त्यांचा उल्लेख ‘छोटा गंधर्व’ असा करू लागले. कालांतराने हे रास्त नावच पक्के रूढ होऊन बसले. ‘प्राणप्रतिष्ठा’ नाटकानंतर ‘स्वर्गावर स्वारी’ व ‘कर्दन काळ’ ही नाटके रंगभूमीवर आणली. त्यानंतर ‘संशयकल्लोळ’ नाटक रंगभूमीवर आणले. छोटा गंधर्वांची ‘रेवती’ची भूमिका त्यांच्या गायनामुळे फार लोकप्रिय झाली. सौदागरांच्या गोड आवाजाला गायन कलेच्या शास्त्रोक्त ज्ञानाची जोड मिळवून देण्यासाठी दामुअण्णानी खूप कष्ट घेतले. बागलकोटकर बुवांना कंपनीत ठेऊन घेतले. १९३०-३१ च्या सुमारास त्यांचा आवाज फुटला. त्यांनी आपला आवाज फुटल्यावर गाणे बंद केले. नाटकात कामे करणे थांबविले व आवाजाला पूर्ण विश्रांती दिली. सात-आठ महिन्यानंतर आवाज हळूहळू सुटू लागला व ते पुन्हा गाऊ लागले. १९३२-३३ मध्ये नाटक धंद्याला आर्थिक मंदीचा तडाखा चांगलाच जाणवला. त्या काळात अनेक नाट्यसंस्था कोलमडल्या.
‘बालमोहन’ नाटक कंपनीची ही आर्थिक स्थिती बरीच बिघडली. पण त्यांना १९३३ पासून एक नवा गुणी नाटककार आचार्य अत्रे कंपनीला लाभले. १९३३ मध्ये अत्र्यांचे ‘साष्टांग नमस्कार’ दहा मे रोजी रंगभूमीवर आणले. यात सौदागरांनी ‘त्रिपुरा’ या स्त्रीपार्टाची भूमिका केली. यानंतर त्यांनी पुरुष भूमिकाच केल्या. १९३४ साली ‘घराबाहेर’ या नाटकात पद्मानाभाची भूमिका केली. बालमोहनच्या वतीने ‘भ्रमाचा भोपळा’, ‘उद्याचा संसार’, ‘लग्नाची बेडी’, ‘वंदे मातरम्’, ‘मी उभा आहे’ या नाटकाने नावलौकिक आणि पैसा मिळवून दिला. या यशात सौदागारांचा वाटा मोठा आहे. दामूअण्णांनी त्यांना रागदारीचे श्रेष्ठ गाणे शिकवण्यासाठी सवाई गन्धर्वांना आपल्या कंपनीबरोबर ठेवले. १९५०-५१ नंतर ‘सौभद्र’, ‘मानापमान’, ‘मृच्छकटिक’, ‘संशयकल्लोळ’ आणि ‘विद्याहरण’ या ५ नाटकातील प्रमुख संगीत भूमिकाच छोटा गंधर्वांनी सुमारे २६-२७ वर्षे केल्या. सौभद्र, मानापमानाने छोटा गंधर्वांनी मराठी मन जिंकले. नोव्हेंबर १९८१ संगीत रंगभूमीच्या शताब्दी निमित्त त्यांनी ‘मृच्छकटिक’ आणि ‘सौभद्र’ मध्ये काम केले. त्यानंतर त्यांनी रंगभूमीवर भूमिका केली नाही.

Top

नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व

जन्म : २६/६/१८८९ मृत्यु : १५/७/१९६७

बालगंधर्वांना गायन कलेची आवड वडिलांकडून आली. तर मातुल घराण्यातून त्यांचा नाट्यकलेशी संबंध जडला. १९०५ मध्ये किर्लोस्कर नाटक मंडळीत त्यांनी प्रवेश केला. १९११ पर्यंत ‘सौभद्र’ आणि तात्यासाहेब कोल्हटकरांच्या ‘वीरतनय’, ‘मूकनायक’, ‘मतिविकार’, ‘प्रेमशोधन’, नाटकांमधून त्यांनी भुमीका केल्या. बालगंधर्वांच्या गोड गायनाने तात्यासाहेब कोल्हटकरांना एखादे संगीत नाटक लिहिण्याची इच्छा झाली. त्यांनी लिहिलेले ‘संगीत मानापमान’ नाटक किर्लोस्कर नाटक मंडळींनी मोठ्या थाटामाटाने दि. १२/३/१९११ रोजी रंगभूमीवर आणले. या नाटकातील संगीत योजना जुन्या सर्व संगीत नाटकांहून अगदी वेगळी पण रसानुकुल असल्याने ती ‘ख्याल’ गायकी एकदम लोकप्रिय झाली.


१९१३ मध्ये बालगंधर्व, बोडस, टेंबे ही त्रयी किर्लोस्कर कंपनीतुन फुटून निघाली आणि नव्या ‘गंधर्व नाटक मंडळी’ची दि. ५/७/१९१३ रोजी स्थापना झाली. दोनच महिन्यात ३/९/१९१३ रोजी पहिला ‘मूकनायक’चा प्रयोग झाला. दि. १०/१२/१९१६ रोजी खाडिलकरांचे ‘संगीत स्वयंवर’ नाटक रंगभूमीवर आले. या नाटकामुळे बालगंधर्वांचे फार नाव झाले. त्यानंतर गडकरींचे ‘एकाच प्याला’ नाटकही कमालीचे यशस्वी ठरले. कोल्हटकरांच्या ‘द्रौपदी’ नाटकाने ‘गंधर्व नाटक मंडळी’वर कर्जाचा डोंगर उभा केला. १९२६ पर्यंत बालगंधर्वांनी सर्व कर्ज व्याजासकट आपल्या हिंमतीवर आणि मेहनतीने फेडले. १९३३ साली बोलपटांचे आक्रमण सुरु झाले. नाटक कंपन्या डबघाईला आल्या होत्या. १/१/१९३५ पासून गंधर्व नाटक मंडळी बंद करून बालगंधर्वांनी बोलपटात काम करण्यास सुरवात केली. पण तेथे ते रमले नाहीत. पुढे गोहरबाईंच्या साथीने १९३८ पासून परत नाट्य व्यवसायाला सुरुवात केली.


भाऊराव कोल्हटकरांची उणीव भरून काढीत संगीत लोलुप रसिकांची मने जिंकून घेतली. सुरेल आवाज, तालात पक्की समाज, मुलायम व मधुर आवाज ही बालगंधर्वांच्या गाण्याची वैशिष्ट्ये होत. भाऊराव कोल्हटकरांच्या नंतर रंगभूमीवर दैदिप्यमान असे यश संपादणाऱ्या बालगंधर्वांची श्रेष्ठता काही औरच होती.

Top

Have a question or need any help?

Please contact - 020 2448 1614