1. आर्ट गॅलरी :
संस्थेकडे उपलब्ध असलेले नाट्यविषयक लेख, कात्रणे, दुर्मिळ कागदपत्रे आणि रंगभूमीवरील अनेक आजी व माजी ख्यातनाम कलाकार, लेखक,
दिग्दर्शक ह्यांची अगणित छायाचित्रे हे सर्व एकत्रितरित्या रसिकांना आणि अभ्यासकांना पहावयास मिळावे, त्यासाठी एक आर्ट गॅलरी उभारून हे सर्व एकाच
ठिकाणी उपलब्ध व्हावे असा संकल्प आहे.
2. ऑडियो/व्हिडियो लायब्ररी :
अनेक जुन्या नाटकांच्या, नाट्यसंगीताच्या तसेच नाट्यसंमेलनाध्यक्षांच्या अभ्यासपूर्ण, रोचक आणि बहारदार भाषणांच्या ध्वनिफिती, विविध इतर कार्यक्रम,
अविस्मरणीय मैफिली असा ध्वनिफिती आणि चित्रफितींचा मोठा संग्रह भारत नाट्य संशोधन मंदिराने जपलेला आहे. नविन अत्याधुनिक तंत्राच्या माध्यमातून
तो अधिक टिकाऊ करण्याचा संस्थेचा मानस आहे ज्या योगे अद्ययावत दुर्मिळ ऑडियो/व्हिडियो लायब्ररीचे स्वप्न साकार करण्याचा संकल्प आहे.
3. सांस्कृतिक देवाणघेवाण :
विविध संस्थांशी सांस्कृतिक देवाणघेवाण करणे आणि त्यासाठी अभ्यासपूर्ण नाट्यविषयक उपक्रम आयोजित करणे, तसेच चर्चा परिसंवाद, सादरीकरण संदर्भाने
लोकाभिमुख कार्यक्रम सादर करणे, विविध दौऱ्यांची आखणी करणे आणि सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध करणे ह्यासाठी संस्था कटिबद्ध आहे. त्यादृष्टीने
बांधणी व्हावी ही संस्थेची इच्छा आहे, त्या दिशेने आम्ही प्रयत्नशील आहोत. ह्या चळवळीत देशाविदेशांच्या विविध सांस्कृतिक संस्थांचा सक्रीय सहभाग
अपेक्षित आहे.
4. शैक्षणिक स्तरावर ... :
संस्थेची कलाविद्यालये हा संस्थेच्या दृष्टीने एक गौरवास्पद उपक्रम आहे. नाट्यविद्यालय, नृत्यविद्यालय, संगीत, गायन वर्ग, तबला वर्ग असे विविध
स्तरावर शैक्षणिक उपक्रम राबविले जातात.
अनेक विद्यार्थी ह्या माध्यमातून प्रशिक्षित होऊन मान्यवर कलावंत म्हणून आजमितीस सुप्रसिद्ध आहेत.
सदर विद्यालयांच्या, विद्यापीठांशी संलग्नतेचा विचार संस्था करीत आहेत. त्या दृष्टीने नियोजन तसेच विद्यार्थी देवाण-घेवाण कार्यक्रम ह्या दृष्टीने काही
ठोस पावले उचलता येतील.
आपण कसे सहभागी होऊ शकाल ......
- आपण प्रकल्पांमध्ये सक्रीय सहभागी होऊ शकता.
- प्रकल्पांना देणगी देऊ शकता.
- चीत्रग्रंथ, लायब्ररी नाट्यपुस्तकांचा संग्रह, संदर्भग्रंथ ह्या विभागाचा विस्तार व आधुनिकीकरण हीसंस्थेची महत्वाची गरज आहे. अशा काही प्रकल्पांसाठी जागा, अथवा जागेकरिता निधी पूर्णतः किंवा अंशतः स्वरुपात देऊ शकता.
- एखाद्या विभागाचे प्रायोजक होऊ शकता.
- आपल्याकडील दुर्मिळ साहित्यसंपदा, ध्वनी-चित्र फितींचा संग्रह रंगभूमीविषयक कागदपत्रे संस्थेला भेट देऊ शकता.
- आपण आपला बहुमूल्य वेळ संस्थेसाठी नक्कीच देऊ शकता.