ठळक नोंदी आणि गौरवशाली घटना

ठळक नोंदी

Year Particulars
१८९५ दसऱ्याच्या दिवशी – ‘हॅम्लेट या नाटकाचा पहिला अंक व पार्थकेय ‘कृष्ण कृत्य-प्रदीप’ या नाटकाचा एक अंक सादर झाला.
१९०५ या वर्षी निरनिराळ्या सार्वजनिक लोकोपयोगी संस्थांच्या मदतीसाठी नाट्यप्रयोग करून दाखविण्याचा सर्व सभासदांनी एकमुखी निर्णय घेतला.
१९१३ स्टुडंटस् सोशल क्लबचे ‘सोशल क्लब’ मध्ये रुपांतर.
१९१९ १२ डिसेंबर रोजी लोकमान्य टिळकांच्या जाहीर सन्मानार्थ ‘त्राटिका’ या नाटकाचा प्रयोग नूतन आर्यभूषण थिएटरमध्ये झाला. या प्रयोगास लोकमान्य टिळक स्वतः हजर होते.
१९२३ १९ एप्रिल पुणे येथे स्वराज्य फंडासाठी ‘कांचनगडची मोहना’ या नाटकाचा नाट्यप्रयोग करण्यात आला.
१९२४ संस्थेची २४’x१८’ साईजची स्वतःच्या मालकीची जागा झाली.
१९२८ मे महिन्यात ‘फाल्गुनराव’ या नाटकाचा प्रयोग झाला. या प्रयोगास महान देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस हजर होते.
१९३५ या वर्षी एअर थिएटर करण्यात आले. याचे उद्घाटन ४ मे १९३५ रोजी झाले. पुण्याचे तत्कालीन कलेक्टर मि. मॅकलॅक्लन उपस्थित होते. २५ मे रोजी संस्थेमध्ये भारत नाट्य संमेलानाचे २७ वे अधिवेशन, थोर कलावंत मा. गोविंदराव टेंबे यांच्या अध्यक्षतेखाली साजरे झाले. ८ जुलै रोजी संस्था रजिस्टर झाली.
१९४४ १७/९/४४ रोजी संस्थेचा पन्नासाव्या वर्षानिमित्त सुवर्णमहोत्सव साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी साहित्यसम्राट तात्यासाहेब केळकर होते. या प्रसंगी ‘तोतयाचे बंड’ या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला.
१९५० १५/८/१९५० पासून संस्थेची घटना अस्तित्वात आली.
१९५१ १६ ते २० मे या दरम्यान संस्थेतर्फे हौशी नटांचे स्नेहसंमेलन भरविले गेले. अध्यक्षस्थानी श्री. केशवराव दाते होते.
१९५२ २६ जुलै रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्निया युनीवर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी संस्थेस भेट दिली.
१९६३ संस्थेचे मंडप थिएटर उभे राहिले.
१९६९ संस्थेने अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले व संस्थेचे नाट्यगृह बांधण्याचा संकल्प सोडला गेला.
१९७० ९ मे रोजी संस्थेच्या अद्ययावत नाट्यगृहाचे उद्घाटन झाले.
1994 संस्थेने 100 वर्षे पूर्ण केली. वर्ष शतक वर्ष म्हणून साजरा करण्यात आला.
2003 संघटना आता 110 वर्षे आहे. विविध उपक्रमांसह वर्ष साजरा करत आहे.

गौरवशाली घटना

रंगभूमीवर संगीत नाटकांचा सुवर्णकाळ असताना संस्थेने प्रारंभिक काळात गद्य नाटकाची परंपरा जोपासली. या संगीत नाटकांच्या सुवर्णकाळाचे गद्य नाटक टिकविले. ‘झुंजारराव’, ‘मोहनतारा’, ‘कांचनगडची मोहना’, ‘त्राटिका’, ‘सत्वपरिक्षा’, ‘फाल्गुनराव’, ‘कीचकवध’, ‘गोडगोंधळ’, ‘उपटसुंभ’, ‘म्युनीसीपालीटी’, ‘उमाजी नाईक’, ‘तोतयाचे बंड’, ‘आग्र्याहून सुटका’, या सारख्या गद्य नाटकांचे प्रयोग सातत्याने केले. आणि आताच्या काळात मराठी रंगभूमीवर गद्य नाटकांचा सुवर्णकाळ असताना संस्था, संगीत नाटक परंपरा जोपासत आहे. नामवंत व गाजलेल्या संगीत नाटकांचे पुनरुज्जीवन करून उत्तमोत्तम संगीत नाटके मराठी रंगभूमीला दिलेली आहेत.


  1. १९३५ मध्ये भारत नाट्य संमेलनाचे २७ वे अधिवेशन मा. गोविंदराव टेंबेंच्या अध्यक्षतेखाली संस्थेने पार पाडले.
  2. १९५१ मध्ये हौशी नटांचे स्नेहसंमेलन भरविले. अध्यक्षस्थानी श्री. केशवराव दाते होते.
  3. १९७० साली संस्थेचे स्वतःचे अद्ययावत नाट्यगृह झाले.
  4. १९७० साली संस्थेने संगीत राज्य नाट्य स्पर्धेमध्ये ‘सं. स्वयंवर’ हे नाटक सादर केले व प्रथम क्रमांक मिळविला. त्यानंतर ‘सं. वैरीण झाली सखी’, ‘सं. मंदारमाला’ या नाटकांनी प्रथम क्रमांक मिळवीत संगीत राज्य नाट्य स्पर्धेमध्ये सतत तीन वर्षे पारितोषिक मिळवून हॅटट्रिक साधली.
  5. या शिवाय संस्थेने ‘सं. भेटता प्रिया’, ‘सं. शाकुंतल’, ‘सं. कट्यार काळजात घुसली’ यासारखी दर्जेदार नाटके सदर केली.
  6. राज्य नाट्य स्पर्धेमध्ये ‘तक्षशीला’, ‘शितू’, ‘हिरा जो भंगला नाही’ या सारखी गद्य नाटके व प्रायोगिक रंगभूमीच्या वळणाने जाणारी ‘एवम् इंद्रजित’, ‘राक्षस’, ‘छत्री’, ‘भैरवी ते भरत वाक्य’, ‘नटावळ’ ही नाटके सादर केली.
  7. १९५२ मध्ये सुरु झालेल्या बालनाट्य विभागामुळे ‘हेमा आणि सात बुटके’, ‘राजकन्या हसली’, ‘मंतरलेलं पाणी’, ‘नीलमपरी’, ‘टुण टुण नागरी खण खण राजा’, ‘जादूचा वेल’, ‘हरवलेलं पैंजण’ या बालनाट्यातुन रोहिणी हट्टंगडी, मोहन जोशी, राजन मोहाडीकर यांच्या सारखे कलावंत रंगभूमीला मिळाले.
  8. कै. वसुमती विजापुरे एकपात्री बहुरूपी अभिनय स्पर्धा ही गेली २५ वर्षे संस्था भरवित आहे. यंदाचे या स्पर्धेचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे.

Have a question or need any help?

Please contact - 020 2448 1614